Alia Bhatt Jigra Movie

 आलिया भट्ट: "मी तुला काहीही होऊ देणार नाही..."; आलियाचा 'जिगरा' चित्रपट 'या' दिवशी प्रदर्शित होणार आहे

Alia Bhatt Jigra Movie
jigara
 

Alia Bhatt Jigra Movie: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही गेल्या काही वर्षांपासून विविध विषयांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट जुलै महिन्यात रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता आलिया ही वासन बाला दिग्दर्शित एका आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आलियाच्या जिगरा या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आलियानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन जिगरा या चित्रपटाची घोषणा केली आहे.

आलिया भट्टनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आलियाचा "मेरी राखी पहनता है ना तू. तू मेरे प्रोटेक्शन मैं है. तुझे मैं कुछ भी नहीं होने दूंगी। कभी भी" हा डायलॉग ऐकू येत आहे. या डायलॉगवरुन असा अंदाज लावला जात आहे की, आलियाचा हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित असणार आहे.

आलिया भट्टनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'अत्यंत टॅलेंडेट वासन बाला दिग्दर्शित आणि धर्मा चित्रपट आणि इटर्नल सनशाईन प्रोडक्शन निर्मित जिगरा सादर करत आहोत. धर्मा प्रॉडक्शनमधूम पदार्पण करण्यापासून ते आता त्यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती करण्यापर्यंत, मी जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा आल्यासारखे वाटते.प्रत्येक दिवस हा वेगळा दिवस असतो. तो रोमांचक आणि आव्हानात्मक असतो. फक्त एक अभिनेत्री म्हणून नाही तर एक निर्माता म्हणून देखील मी या चित्रपटावर काम केलं आहे.' 

कधी रिलीज होणार जिगरा?

आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने