Krushi Sevak Bharti 2023

 

पदवीधरांना कृषी विभागात नोकरीची मोठी संधी! कृषी सेवक पदाच्या २०७० जागांसाठी भरती सुरु

Krushi Sevak Bharti 2023

महाराष्ट्र कृषी विभागाने “कृषी सेवक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी विभाग महाराष्ट्र भरती मंडळाने सप्टेंबर २०२३ च्या जाहिरातीत एकूण २०७० रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर केला आहे. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Krushi Sevak Bharti 2023

 

विभागाचे नाव – कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य.

पदाचे नाव – कृषी सेवक.

एकूण रिक्त पदे – २०७०.

शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.

अधिकृत बेवसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/

वयोमर्यादा –

  • सर्वसाधारण प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.

  • मागास प्रवर्ग – १८ ते ४५ वर्षे.

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये.

  • मागासवर्गीय – ९०० रुपये.

पगार – उमेदवारांना महिना १६ हजार पगार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३.

 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने