महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र 2023 मराठी : अर्ज ऑनलाइन | rojgar.mahaswayam.gov.in
महाराष्ट्र राज्यात मोठ्याप्रमाणात सुशिक्षित बेरोजगार असलेले तरुण आहेत, जे रोजगाराच्या शोधात असतात परंतु त्यांना रोजगार शोधण्यात अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो, या सर्व बेरोजगार तरुणांच्या अडचणी व समस्या विचारात घेऊन राज्य शासनाने महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणार आहे, या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा शासनाचा उद्देश आहे. वाचक मित्रहो या लेखात आपण शासनाच्या महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल संबंधित संपूर्ण माहिती उदाः ऑनलाईन अर्ज कसा करावा, ऑफलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्र, इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत
| |||
---|---|---|---|
|