🗣️ इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारल्यास कुठे करावी लागेल तक्रार?
If the claim is rejected by the insurance company, where should the complaint be filed?
📑तुम्ही इन्शुरन्स क्लेम केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीने प्रतिसाद न दिल्याने अनेक जण निराश होतात. अशा वेळी तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. अशावेळी तुम्ही तुमची तक्रार भारतीय पॉलिसी नियामक आणि विकास प्राधिकरणच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदवू शकता. या व्यासपीठाला 'Bima Bharosa System' म्हणून देखील ओळखले जाते. तसेच तुम्ही @irdai.gov.in या मेल आयडीवर देखील तक्रार नोंदवू शकता.
याव्यतिरिक्त तुम्ही १५५२५५ किंवा १८००४२५४७३२ नंबर डायल करून देखील तुमची तक्रार दाखल करू शकता. तुम्ही इन्शुरन्स कंपनीने नाकारल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत विमा लोकपालकडे तक्रार दाखल करू शकता. तुम्ही तुमची तक्रार https://www.cioins.co.in वर ऑनलाइन नोंदवू शकता किंवा तुमच्या जवळच्या लोकपाल कार्यालयात जाऊन तुमची तक्रार ऑफलाइन देखील नोंदवू शकता.
📌जर तुमचा इन्शुरन्स नाकारला असेल तर, तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचात कमी पैशांच्या दाव्याबद्दल तक्रार करू शकता. येथे तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा तक्रार लिहू शकता. लक्षात ठेवा की तक्रारीसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडलेली असणे आवश्यक आहेत.