🗣️ जमीन बक्षिसपत्र म्हणजे काय आणि ते कसे केले जाते
What is a land grant and how is it done? /
जमीन बक्षिसपत्र म्हणजे काय
💰 मुद्रांक शुल्क किती?
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 2017 नुसार महाराष्ट्र राज्य भेटवस्तू डीडच्या मालमत्तेच्या मूल्याच्या 3 टक्के मुद्रांक शुल्क आकारते आणि कुटुंबातील रक्तातील सदस्यांना कोणतेही पैसे न देता शेतजमीन भेट म्हणून दिली गेल्यास मुद्रांक शुल्क 200 रुपये आहे.
📄 जमीन बक्षीसपत्र व्यवहार
आपण आपल्या मालकी हक्काची जमीन इतर कोणास कायमस्वरूपी देतो. तेव्हा त्या जमीन व्यवहारास बक्षीसपत्र असे म्हणतात.
📌 रजिस्ट्री करताना काय काळजी घ्याल?
बक्षीसपत्र रजिस्ट्रीमध्ये बक्षीस कोणाला देत आहोत, त्या व्यक्तीचे आपल्याशी नाते आणि स्पष्ट कारण लिहिणे महत्त्वाचे आहे.
💁♀️ यांनी उपस्थित राहणे अनिवार्य
मिळकत हस्तांतराचा दस्तावेज नोंदणी करताना त्यावर नोंदणी कायद्यानुसार लिहून देणारा व घेणारा सही व इतर सोपस्कारांसाठी सहदुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे.
✍️ साक्षीदारांच्या सह्या गरजेच्या
बक्षीसपत्र साध्या कागदावर स्वहस्तेही करता येते. परंतु त्याला पुढे कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे लिहून ठेवताना दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत.